ओरिएन्टेशनला दृष्टिक्षेपाची दिशा म्हणणे किंवा ऍस्पेक्टला पैलू, ही जराशी ओबडधोबड भाषान्तरे वाटतात. दृष्टिक्षेप म्हणजे एका क्षणापुरती टाकलेली नजर(कटाक्ष). साधे शब्द-- बघण्याची/ठेवण्याची/असण्याची दिशा. घर पूर्व-पश्चिम आहे; शंकराच्या पिंडीची दिशा उत्तर-दक्षिण असते; दुर्बिणीची दिशा शनीकडे वळवली; चित्राकडे समोरून पाहिले की ते वेगळे दिसते आणि बाजूने पाहिले की निराळे; बुद्धिबळाचा पट मांडताना पांढरा चौरस खेळाडूंच्या उजव्या हाताला आला पाहिजे. या सर्व वाक्यांचे इंग्रजी भाषान्तर करताना ओरिएन्टेशन हा शब्द वापरता येईल. ऍस्पेक्ट म्हणजे अभिमुखता. ऍस्पेक्ट रेशो म्हणजे सपाट वस्तूचे समोरून घेतले गेलेले गुणोत्तरी मोजमाप. थोडक्यात अभिमुखी (माप)गुणोत्तर.
आकृती म्हणजे डायग्रॅम. आकार म्हणजे शेऽप. त्यामुळे पोट्रेट आकार म्हणजे तसबिरीचा रेखाकार, (तसबिरीसारखी) उभी मांडणी/ठेवण, लॅन्डस्केप म्हणजे (निसर्गदृश्याच्या तसबिरीसारखा)आडवा चित्राकार, चित्राची क्षितिजसमान्तर मांडणी..
अर्थात ही माझी मते आहेत,. रूढ शब्द काय आहेत याची सुतराम कल्पना नाही.