एक चौरसमीटर कागदाची लांबी-रुंदी अनुक्रमे ल आणि र आहे. (म्हणून लर=१; ल=१/र; र=१/ल). कागद लांबीच्या मध्यभागी दुमडला किंवा कापला. आता कागदाची लांबी र होईल आणि रुंदी अर्ध्या ल इतकी. या नव्या तुकड्याच्या लांबी रुंदींचे गुणोत्तर मूळ कागदासारखेच आहे. म्हणजे र भागिले ल/२=ल/र. सोडवून येईल ल२=२र२. म्हणून १/र२=२र२. (आणि ल२=२/ल२). म्हणून मूळ कागदाची रुंदी=
र=०.५ चे चतुर्थमूळ=०.८४०मीटर= ८४० मिलिमीटर. आणि लांबी ल= २चे चतुर्थमूळ=१.१८९ मीटर=११८९ मिलिमीटर.
यावरून सोपा नियम निघाला की रुंदीला २च्या वर्गमूळाने(१.४१४ने)गुणले की लांबी येते. किंवा लांबीला १.४१४ ने भागले वा १/१.४१४(= ०.७०७) ने गुणले की रुंदी येते.
म्हणजे कागदाचा आकार ए शून्य=वर काढल्याप्रमाणे ११८९ गुणिले (११८९*.७०७=) ८४०.
आकार ए-वन=८४० गुणिले ५९४(=८४०*.७०७).
ए-२=५९४ बाय ४२०
ए-३=४२० बाय २९७
ए- ४=२९७ बाय २१० वगैरे वगैरे.
एकच शंकाः- मूळ कागद एक चौरसमीटर का घेतला असावा?--अद्वैतुल्लाखान