ऍस्पेक्ट रेशोला प्रतिशब्द मी कोण सुचवणार? अनेक परिभाषातज्ज्ञ आहेत, त्यांना विचारावे लागेल.
तरी मला वाटते की, शब्द नसेल तर बनवावा लागेल.  इंग्रजीत ब्‍लाइन्‍ड  + स्टंट =ब्‍लन्‍ट; फ़्‍लॅ‌श + ब्‍लश = फ़्‍ल‌श; ग्लेअर + गेऽझ = ग्‍लेऽझ; स्लिप + ग्लाइड = स्लाइड; मोटर + हॉटेल = मोटेल इ. इ. या धर्तीवर अभिमुख + गुणोत्तर = अभिमुखोत्तर= ऍस्पेक्ट रेशो..
अन्यथा, माप आणि मोजमाप या दोन शब्दांना वेगवेगळे अर्थ द्यायचे. एक लांबी गुणिले रुंदी साठी आणि दुसरा लांबी भागिले रुंदीसाठी. असे केले तर आपल्याला शब्द मिळेल-- अभिमुखी मोजमाप!(समोरून मोजलेले लांबी-रुंदींचे गुणोत्तर). हा शब्द कुठल्यातरी प्रमाण शब्दकोशकर्त्याने स्वीकारला की रूढ होण्यास प्रत्यवाय नसावा.