मिलिंद, खरोखरीच सुरेख.
मात्र एरव्ही सुंदर असलेल्या कवितेतली निराशा आवडली नाही.
म्हणून केवळ, मी थोडे शब्द बदलून खालील ओळी लिहील्या.
तुमची क्षमा मागून इथे सादर करीत आहे,
निव्वळ सकारात्मक भाव जागविण्यासाठी.
अर्थातच आकृतीबंध पाळला का?
वगैरे प्रश्नांची उत्तरे मजजवळ नाहीत.
हे विडंबन नाही.
मला जो सकारात्मक भाव, भावला असता त्याचा साज आहे.
प्रारब्ध हे खरे ना सुजाण माणसांचे ।
भयभीत चेहरा ना निशाण माणसांचे ॥ १ ॥
स्पर्धेत जीवघेण्या टिको विवेक थोडा ।
नच हो विचार सारे गहाण माणसांचे ॥ २ ॥
वाऱ्यास मुळी न पाठ, प्रवाहशरण ना मी ।
न घटो स्वतंत्रमार्गी प्रमाण माणसांचे ॥ ३ ॥
बंदूक लेखणी ना, शब्दही मुळी न गोळी ।
दृक् चित्रणास, बांधा मचाण माणसांचे ॥ ४ ॥
मृग ना शिकार करीती उगाच सावजाची ।
हे ध्येय नित्य राहो, सदैव माणसांचे ॥ ५ ॥
सोडून मंदिराला कधी न देव गेला ।
ऐकू पुराण त्याचे, आदर्श माणसांचे ॥ ६॥
उमगून वाट गेली, पाहून धृव तारा ।
आहे, 'नरेंद्र' बाकी इप्सित माणसांचे ॥ ७ ॥