मोठ्या पडद्यावर दाखवण्याची स्थानिक सेवा देणारा मस्कत मधला पहिला ठरलो. >> अरे वा! हार्दिक अभिनंदन.
तुम्ही, तुमची पत्नी तसेच मुलांनीही येईल त्या प्रशिक्षण संधीचा उपयोग करत, परक्या देशात साध्य केलेली विद्या कौतुकास पात्र आहे. तुमच्या या श्रेयांत आणि संचितांत अविरत भर पडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
झरोका, पडदा, फेरभिंग इत्यादी मराठी शब्दसंयोजनाचा तुमचा निदिध्यासही वाखाणण्यासारखा आहे. त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद. मराठीच्या महाजालावरील वापरात भविष्यात दिसून येतील असे कितीतरी शब्द तुम्हीच घडवलेले असतील ह्यात मला मुळीच संशय नाही. यासाठी मी तुमचे आधीच अभिनंदन करतो आहे.