तुम्हा सगळ्यांचे असेच  प्रोत्साहन मिळाल्यानेच मी तंत्रज्ञानाच्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा शोध घेण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली आहे. हे शब्द बोलताना सहज, छोटे  तसेच कार्य पद्धती द्योतक असावे असे जाणवले. म्हणूनच प्रतिमा ग्राहकाला प्रग्रा (कॅमेरा) म्हणावेसे वाटले. क्षणिक प्रकाश - क्षप्र - (फ्लॅश) म्हटले आहे. एकाने त्यालाच क्षणिक दीप असे सुचवले होते. पण दीप म्हटले की जळणारा दिवा समोर येतो. आधुनिक उपकरणांच्या कार्यपद्धतीत रोज बदल होत असल्याने कालची माहिती आज निरुपयोगी ठरते आहे. कालच्या चित्रफीत प्रग्राचा पडदा आजच्या संख्यीय प्रग्रात वापरात नसून एका नवीन कार्यपद्धतीचा वापर होत आहे.