तू निमित्ताएवढी गझलेमधे
अन निमित्ताएवढा शब्दार्थही
संपवावे एकदा व्यक्तीकरण
सापडावा एकदा मथितार्थही
-सुंदर.'चरितार्थ'ही छान.
दोन गोष्टी कळल्या नाहीत त्याविषयी खुलासा कराल का? एक म्हणजे 'पार्थ' व दिव्यदृष्टी.नेमका पार्थाचाच उल्लेख करण्याचे काही विशेष कारण? दिव्यदृष्टी युद्धाचे धावते वर्णन करण्यास संजयास दिली गेली होती. पार्थास काही क्षणांचे दिव्यरूपदर्शन दाखवले त्याच्या हा संदर्भ आहे की अजून काही? दुसरी गोष्ट, "आठ दशके"चाही नेमका संदर्भ कळला नाही.