एकच शंकाः- मूळ कागद एक चौरसमीटर का घेतला असावा? --अद्वैतुल्लाखान >>
या प्रश्नाचे उत्तर कदाचित ब्रिटिश मापन पद्धतीत सापडू शकेल. कागद निर्मिती कागदाच्या पट्ट्याच्या स्वरूपात केली जाते. ती त्या काळी ज्या रुंदीच्या पट्ट्याच्या रूपात करण्यात येत होती तिच्या आसपासचा आकार सर्वात जास्त स्वीकारार्ह ठरला असावा. आजही काच, आरसे, प्लायवूड (पडपा लाकूड?) इत्यादी वस्तू ४' x ८' या आकारात मिळतात. त्या काळीही ४' पट्ट्याच्या आकारात कागदनिर्मिती होत असावी. ४' म्हणजे अदमासे १२०० मिलिमीटर. म्हणून ११८९ हा जवळचा आकार निवडला असावा.