मुलाकडून अवास्तव अपेक्षा करताना पालक स्वतःची प्रगतीपुस्तके उघडून पाहतील तर बरे होईल. दुसरे म्हणजे मुलाच्या गुणदोषांची सर्व नातेवाईकांमध्ये वाच्यता/ चर्चा करून मुलाला कमीपणा आणण्यात पालक धन्यता मानतात हे वाईट आहे. तिसरे म्हणजे "अगदी चांभार झालास तरी असे जोडे शीव की सर्व भारतात तुझ्यासारखे कोणी शिवणार नाही" हे लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलाला सांगितले तसे पालकांनी सांगायला हवे.  सर्वात मुख्य म्हणजे एकदा निकाल लागल्यावर मुलाला नावे ठेवण्यापेक्षा शिक्षण सुरू असताना मुलगा कोठे कमी पडतोय, त्याला शिकवणी/क्लासची गरज आहे का, मार्कस् कसे वाढवता येतील याबद्दल पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. निकाल लागल्यावर चर्चा करून फायदा नाही.

मुलाच्या आवडीनिवडी न बघता इतर जे करतात तेच आपल्या मुलाने करावे असे पालकांना वाटते याबद्दल मात्र त्यांना दोष देता येईल असे वाटत नाही. कारण ज्या वेळी ज्या शिक्षणशाखेची चलती आहे तीच शाखा मुलाने घ्यावी कारण तसे केले नाही तर भविष्यात पुरेसे पैसे मिळणार नाहीत असे त्यांना वाटते. सुमारे ३० वर्षांपूर्वी बारावीची मुले डॉक्टर/इंजिनियर व्हायचीच स्वप्ने बघायची कारण त्याच शाखांची चलती होती (आणि ते होणे अवघडही होते. आज दोन्ही होणे सोपे झाले आहे. ). स्वानुभवाने सांगतो की कष्ट करायची तयारी असेल तर नावडत्याही विषयात प्रावीण्य मिळवता येते.

विनायक