पैलू हा शब्द नाकारला आहे. तर इतर कुठला शब्द अस्पेक्टचा अर्थ व्यक्त करू शकेल?
असा जर प्रश्न असता तर तुमचा विचार ठीक आहे.
मात्र अस्पेक्ट करता पैलू शब्द का बर स्वीकारता येणार नाही? अशीही बाजू तुम्ही मांडलीत तर बरे होईल.
हिऱ्याला पैलू पाडतात. व्यक्तीमत्वाला निरनिराळे पैलू असतात. जीवनाचा एखादा पैलू अव्यक्तच राहतो. पैल तीरावरून ऐल तीर निराळाच दिसतो. तो पैलू ऐल तीरावरून दुष्प्राप्यच. खेळाडू अष्टपैलू असतात. इत्यादी वाक्यप्रयोगांतून व्यक्त होणारा पैलू या मराठी शब्दाचा अर्थ; या बाबतीतील अस्पेक्टच्या "दर्शनी", "प्रसर", "अभिमुखता" इत्यादी अर्थच्छटांपेक्षा मला जास्त उचित आणि स्वीकारार्ह वाटतो.
मग अस्पेक्ट = पैलू हे का बरे नाकारायचे?
आणि मग विचारपूर्वक हा अर्थ अस्वीकारार्हच ठरवला गेला तर प्रस्तावित नवा अर्थ, अभिव्यक्तीत किमान त्याच्याइतका सशक्त तरी असायला हवा ना!