मृदुला, मिलिंद व चित्त,
मनापासून धन्यवाद!
खुलासा -
१. माणसाला 'जीवनात कसे वागावे' हे सांगण्यासाठीच विष्णूने महाभारताचे युद्ध घडवून आणले. माणसाने विष्णूचेच का ऐकावे हे सांगण्यासाठी अर्जुनाला विश्वरूप दर्शन घेता यावे यासाठी त्याला दिव्यदृष्टी दिली गेली. खरे तर यात 'प्रभावी समारोप' झालेला नसावा, मात्र सर्वच द्विपदींमध्ये तसा व्हायला हवा की नको हाही एक प्रश्नच पडावा अशा मर्यादा गझलतंत्र घालते असे वाटते. 'दिव्यदृष्टी'शिवाय त्या शिकवणीचे महत्त्व मनुष्यजातीला पटलेच नसते असे म्हणायचे आहे. 'पार्थ' हा एक काफिया आहे हे महत्त्वाचे कारण आहेच, पण काफियावरून शेर रचणे हे अनैसर्गीक मानणेही कितपत अनैसर्गीक आहे असा मला प्रश्न पडतो.
२. आठ दशके - सर्वसाधारणतः 'जास्तीतजास्त' आयुर्मर्यादा ८० वर्षांच्या आसपास असते. (अर्थातच, अपवाद सोडून) (वृत्तासाठी सात, पाच, काहि, वगैरे चालले असतेच, पण आठ दशके ला हल्लीच्या आयुर्मर्यादेनुसार जरा 'बेस' आहे असे वाटले म्हणून 'आठ') माणूस आयुष्यभर स्वार्थ साधणे शिकत असतो व साधतही असतो. मात्र मृत्यूचा एक क्षण त्याला 'सगळे सोडून देणे आवश्यक आहे' हे शिकवतो, नि:स्वार्थी बनवतो.
धन्यवाद!