आपला हा अतिशय सुंदर लेख वाचून एक नवीनच माहिती मिळाली. किंबहुना एका नव्याच गोष्टीबाबत विचार करता येईल हे जाणवले. मात्र माझ्या मनात काही 'पण' आहेत.
१. सध्याच्या काळात याच विषयावर तत्त्वज्ञांची मते काय आहेत?
२. मानवाच्या उत्क्रांतीच्या विशिष्ट टप्प्यांवर मेंदूमध्ये 'भाषा व्यवस्थित समजण्याची' क्षमता निर्माण झाली हे एक गृहीत आहे की ते सिद्ध झाले आहे? जर तसे सिद्ध झाले असले तर प्राण्यांच्या आयुष्यात भाषा नसतेच हे सिद्ध होईल काय?
३. समजा एका नुकत्याच जन्मलेल्या मुलाचे पालनपोषण व्यवस्थित केले मात्र ते मूल पाच वर्षाचे होईपर्यंत त्याच्यासमोर कुणीही काहीही बोलले नाही किंवा तोंड पूर्णपणे बंद ठेवले तर ते मूल भाषा समजू शकेल किंवा निर्माण करण्याच्या मागे लागू शकेल का? (तोंडी भाषा - देहबोली वगैरे नाही)
धन्यवाद!