Express ... येथे हे वाचायला मिळाले:
बऱ्याच दिवसानी पुण्यात आल्यावर जसं सगळं जुनंच नव्यानं दिसायला लागलं तसं बरेचसे जुने अदृश्य झालेले मित्र वगैरेपण परत भेटायला लागले. नव्यानं बघताना नकळत आपण "किती बदललायस तू?" किंवा "काहीच बदलला नाहीस यार तू!" या वाक्याना जागा शोधत असतो. मला वाटतं प्रत्येकजण ही वाक्यं तरी फेकत असेलच. नाहीतर आपणतरी समोरच्याला "ईतक्या दिवसानी आलायस असं वाटतच नाही" या वाक्याला जागा करून देतो. पण कमीत कमी या वाक्यांची देवाण घेवाण झाल्याशिवाय आठवणी सुरूच होत नाहीत. पुर्वीच्या थेअऱ्या, लोजीकंच काय तर अगदी ठरलेले पीजे पण परत निघतात. जुन्या विश्वात घेऊन जातात या ...