बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
सलोनीबाई
माऊईहुन परत येऊन ७ दिवस झाले परंतु अजुनही मन तिथेच आहे. अजुनही असेच वाटते आहे की सकाळी उठले की पहिली गोष्ट दृष्टीस पडेल ती म्हणजे घनदाट झाडांमधुन आकाशाकडे झेपावणारे, गवताच्या पात्यांसारखे माड आणि त्यांच्या पाठीमागे ढगांनाही भेदुन आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारा उत्तुंग हालेयाकाला पर्वत. अजुनही लाटांचे आवाज येत आहेत. अजूनही असेच वाटते की घराबाहेर गाडी काढली की वडांच्या रांगा समोर येतील. उसांची शेती दिसेल ... निळ्याशार पाण्याशेजारुन वळण घेत जाणारे रस्ते लागतील. माऊईचे सौंदर्य नुसते प्रेक्षणीय नाही तर भावनिक वाटले. कदाचित ...
पुढे वाचा. : हवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण