ऍस्पेक्ट रेशोमध्ये चौकटीविषयीचं विधान असतं. एखादी चौकट ही चौरसाच्या किती जवळ आहे (लांबी = रुंदी), आयताकृती असल्यास आयत किती उभट किंवा किती लांबट आहे, याविषयीचं ते संख्यात्मक वर्णन आहे. त्यामुळे चौकट गुणोत्तर हा शब्द चालू शकेल, असं वाटतं.

माझ्या मते मूळ इंग्रजी संज्ञेतला 'ऍस्पेक्ट' हा शब्द मुळात 'ऍस्पेक्ट रेशो' या संकल्पनेला आज चपखल बसत नाही. मराठीत प्रतिशब्द बनवताना मूळ संकल्पनेशी नातं ठेवलं, तर मराठी माणसाला ती संकल्पना कळायला कदाचित मदत होईल. म्हणून चौकट गुणोत्तर हा शब्द सुचला.