ही माहीती कुठे वाचली याचे फार चांगले उत्तर नाही माझ्याकडे. परंतु आपण नीट अभ्यास केला तर काही गोष्टी लक्षात येतात.
स्वर म्हणजे असा वर्ण, की जो कोणत्याही प्रकारे आघात न करता, आणि दुसर्या वर्णाचा आधार न घेता उच्चारता येतो. म्हणुनच अ आ वगैरे स्वर आहेत. आणि क ख आदी व्यंजने आहेत.
१) य र ल व: व्यंजने क ते म या मध्ये कोठेही बसत नाहीत. त आणि थ, द वगैरे मध्ये जसा संबंध आहे तसा य र ल मध्ये नाही.
तसेच, संधी नियमाप्रमाणे इ + अ = अ, उ + अ = व, ऋ + अ = र, (म्हणून लृ + अ = ल असावे) होते. या सर्वाचे अनुमान असे की य र ल व ही व्यंजने अनुक्रमे इ ऋ लृ उ या स्वरांपासून बनलेली आहेत.
२) स श ष हः इंग्रजीत ज्याला हिस्सीग साउंड म्हणतात ती. या चारी व्यंजनात स्वरयंत्रातून आवाज उचारण्यापूर्वी (म्हणजे अ म्हणण्यापुर्वी) आपण नुसताच फुंकरीचा ध्वनी करतो. ह च्या वेळी तो कंठातून, स श ष च्या वेळी जीभ टाळू  यांच्या आधाराने करतो. आता हे जे हिस्सिंग आवाज आहेत, त्यात कुठे स्वरयंत्र नसल्यामुळे आणि त्याचा स्वतंत्र वापर कोठेही होत नसल्याने त्यासाठी स्वतंत्र अक्षर योजलेले नसावे. fox मधला फ ही याच रांगेत बसवला पाहीजे. (आपल्यालडील विसर्गाचा उच्चार हा त्या आधिच्या स्वरानंतर केलेला नुसताच हिस्सिंग आवाज (ह सारखा) असावा. अन्यथा विसर्ग न लिहिता सरळ ह/हा लिहीले असते).
३) ळ: हा बिचारा य .. व किंवा स ..  ष यात कोठे ही बसत नाही. दोन वेगळे स्वर/आवाज एकत्र करून (य, र स प्रमाणे) ळ चा उच्चार करता येत नाही. लृ सारखा ळ चा एखादा स्वर (ळृ) कल्पिला तरी त्याला सरळ अ जोडून ळ चा उच्चार होत नाही. त्या ळृ आणि अ च्या 'मध्ये' ही 'काहीतरी' असते.

आता इथे लिहीलेले बरेचसे अनुमानावर आधारित आहे. कुणाकडे अधिक योग्य माहिती असल्यास सर्वांनाच उपयोग होईल.