असे शब्द घडवावेत की नाही हा वेगळा मुद्दा झाला. पण घडवायचेच असल्यास व्युत्पत्तीनुसार 'कृष्णखंडणी' च योग्य आहे, 'कृष्णपत्र' वा 'काळी चिठ्ठी' नाहीत, कारण ब्लॅकमेल ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीनुसार त्यातील 'मेल' हा भाग मध्ययुगीन इंग्रजीतील 'male' (रेंट, ट्रिब्युट=खंडणी) वरून आलेला आहे, mail=पत्र/चिठ्ठी अशा अर्थाने नाही. अधिक माहितीसाठी इथे वा इथे पाहावे.