परंपरावादी ब्रिटिशांनी अजून फूट, यार्ड, मैल जपून ठेवले आहेत, ते चौरसमीटर कुठले स्वीकारणार? शहाण्णव पेन्सच्या ऐवजी आता शंभर पेन्सचा एक पौन्ड होतो, तेवढीच सुधारणा झाली आहे. औंस, गॅलन, पिंट, हंड्रेडवेट अजून वापरात आहेत.
ब्रिटिश टन(२२४० पौंड), छोटा टन(२००० पौंड) हे आंतरराष्ट्रीय मेट्रिक टनापेक्षा (२२०५ पौंड) वेगळ्या वजनाचे आहेत.त्यामुळे ब्रिटिशजन  कागदाच्या १ मीटरच्या जवळपास म्हणून  ११८९ मिलिमीटर स्वीकारतील हे पटणे जरा कठीणच.
ब्रिटिशांचे कागदांचे आकार वेगळेच आहेतः--ऍटलास(३४ X २६ इंच), क्राउन(२० X १५ इंच), डेमी(२२/२ X १७/२ इंच),
फूल्स्कॅप(१७ X १३/२ इंच) वगैरे. मोठ्या कागदाच्या(लार्ज शीट) अर्ध्या आकाराच्या कागदाला किंवा त्या आकाराच्या वहीला फोलियो म्हणतात, पाव आकाराला क्‍वार्टो, आणि एक अष्टमांश आकाराला ऑक्टॅव्हो, हेही कागदाचे ब्रिटिश आकार आहेत.
अर्थात या गोष्टीमुळे ए-४ या मापाला बाधा येण्याचे काही कारण नाही. --अद्वैतुल्लाखान