न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणें सगळे ग्रह बरोब्बर बारा वाजतां जिथें असतील तिथूनच सरळ रेषेंत जायला लागतील. आपल्या कक्षेंतल्या असल्या ठिकाणच्या बिंदूंतल्या स्पर्शरेषेच्या दिशेंत. म्हणजे पाहा; बारा वाजतां पृथ्वीच्या दिशेनें निघालेला सूर्यापासून निघालेला सूर्याचा शेवटचा प्रकाशकिरण बारा वाजून नऊ मिनिटांनीं पृथ्वीपर्यंत पोहोंचेल. पण गुरुत्त्वाकर्षणाची शक्ती मात्र बरोब्बर बारा वाजतांच नष्ट होईल. म्हणजेच गुरुत्त्वाकर्षण हें प्रकाशापेक्षां जास्त वेगानें प्रवास करतें.

हे कधी डोक्यात आले नाही! प्रकाश सुरू आणि बंद होतो हे डोळ्यापुढे असल्याने 'प्रकाश पोहोचायला लागलेला वेळ' वगैरे गोष्टी डोळ्यापुढे आणणे तुलनेने सोपे जाते पण गुरुत्वाकर्षण सुरू होणे किंवा संपणे असे कधी दिसत नाही. (ते आपले असतेच!) त्यामुळे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपर्यंत 'पोहोचायला' वेळ लागेल हे मनात आले नाही. असे काहीही अनुभवात नसताना ह्या शास्त्रज्ञांना अशी कल्पना कशी काय सुचली असेल?

अचूकता, रंजकता, गतिमानता ह्या सगळ्याचा समतोल ह्या लेखात फार सुंदरपणे साधलेला आहे आणि त्यामुळेच दीर्घ असूनही शेवटपर्यंत हा लेख मनाची पकड घेतो असे वाटते.