कागदाच्या  आकारांसाठीची  ए मालिका पुस्तकांच्या, नियतकालिकांच्या  आणि लिहायच्या कागदांसाठी असते.
याशिवाय बी आणि सी  नावाच्या कागदाच्या आकारांच्या आणखी दोन आंतरराष्ट्रीय मालिका आहेत.
त्या अनुक्रमे भित्ति‌विज्ञापने(Posters), आणि लखोट्यांसाठी(envelopes) उपयोगी आहेत. बo(१००० गुणिले १४१४ मि. मी. ),
ब२(५०० गुणिले ७०७), ब४(२५० गुणिले ३५३) वगैरे. इथेही ए मालिकेप्रमाणेच लांबी अर्धी  करून घडी
घातली की  पुढचा लहान आकार बनतो. लांबी-रुंदींचे गुणोत्तर तेच राहते. सी-मालिकेतले आकार--सीo(९१७बाय१२९७मिमी) आणि असेच
सी१, सी२ वगैरे. लखोट्यांसाठी सी/६(८१ बाय १६२ मिमी) आणि डी-एल(११० गुणिले २२० मिलिमीटर)
हेही आकार असतात.