एक म्हणजे जे आयुष्यात यशस्वी होतात त्यांचे सर्वच लोक कौतुक करतात.. सर्व साधारण कामगिरीचे कोणीच विशेष असे कौतूक करून दाखवीत नाहीत. शिवाय म्हणलेच आहे " सर्व गुणम कांचनं आश्रयंती ! " सहाजिकच कमर्शिअल शिक्षण घेणारे , मोट्ठे पॅकेज पगार असलेले लोक भाव खाऊन जातात.. मुळात चांगल्या गुणी होतकरू लोकांचे कौतूक आपण एकल्यास आपल्याला हुरूप आला पाहिजे. असे मनातल्या मनात चरफडणे बंद केले पाहिजे.. आपण आपले काम १०० टक्के करायचा प्रयत्न करावा.. स्वतःच्या समाधानासाठी कुठलीही गोष्ट करावी, कोणी आपले कौतूक करावे म्हणून काही करण्याचा अट्टाहास ठेवूच नये, मग तुम्ही बी कॉम करा नाही तर बी ए .. तुम्ही करत असलेल्या कामात १०० टक्के देऊन समाधानी राहावे