चार वर्षाच्या मुलाला मज्जाव नव्हता, पुरुषांच्या "भुकेल्या" नजरेला मज्जाव होता. मी स्वत: काही लग्नाचे चलचित्रण केले होते, परंतु ठरावीक नाच प्रकार सुरू झाल्यावर चित्रण बंद करायला सांगून मला बाहेर जायला सांगितले होते.  ह्याचे कारण ठरावीक बायकांचा गट लोक कलेचा आधार घेऊन शरीराच्या विशिष्ट हालचाली करत शृंगाराचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत होता. ही आफ्रिकेतली एक प्रथा आहे. बायकोने चित्रित केलेली चित्रफीत संपादन करताना मी तो प्रकार बघितला होता. बराचसा प्रबोधनाचा प्रकार होता हे पटले.

माझ्या लिखाणाला वाचकांचे प्रतिसाद येत आहेत त्यांचे मनापासून आभार.