कृष्णखंडणी हा शब्द फारसा रुचला नाही. एक तर कृष्ण आणि खंडणी असे संस्कृत व अ'संस्कृत' असे  शब्द एकत्र आल्याने थोडे 'गंगाजमनी' वाटत आहे. मूळ ब्लॅकमेलचा शब्दशः अर्थ आणण्यासाठी कदाचित कृष्णखंडणी बरोबर वाटत असेल पण अर्थ समजण्याच्या दृष्टीने ह्या भाषांतराचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. मग अद्वैतुल्लाखान यांनी सुचवलेले 'बिंग' शब्दावर आधारित शब्द त्यातल्या त्यात बरे वाटत आहेत. (त्या यादीत 'बिंगवसुली' हा बसेल का?) असो. खरे सांगायचे झाले तर ब्लॅकमेल हाच मराठीत रूढ करण्यास हरकत नसावी असे मला वाटते.