छान लिहिले आहे. भारतात शिक्षण व ज्ञान ह्यात सोयिस्कर गैरसमजूत करून देण्यात आली आहे. त्यात प्रमाणपत्रांचा धुडगूस व अवास्तव महत्त्व ह्यामुळे असले प्रकार घडतात हे मी अनुभवले आहे. आशाच एका "सुप्रियाने" आळ्या झालेल्या रव्याचा शिरा खायला घालण्याचा प्रयत्न केला होता. नव्याने शिकलेल्या युक्तीवादाने तीने "नॉन्व्हेज अवडीने खाता मग आळ्या आहेत म्हणून शिरा खाण्याचे का नाकरता? " असा प्रश्न टाकला होता.  ज्ञानाला, अनुभवाला कर्तूत्त्वाला मधल्या काळात फक्त भारतात दुय्य्म मानले जाण्याची सवय लागली. प्रमाणपत्र मिळवणे हेच एक ध्येय मानले गेले आहे. काही वर्षात ही स्थिती बदललेली आहे. लालू यादव सारख्या माणसाने  रेल्वेला अवाढव्य नफा (खोटा) करून दिला हे मान्य करणारे सगळे प्रमाणपत्र धारकच होते.  अशा माणसाला डॉकरेट देणे हा बूटाचाटेपणाच होता. आता त्याला सोयिस्कर राजकारण म्हणण्याचा युक्तिवाद सुरू झाला आहे.
मी ऑस्ट्रेलीयात चॅनल ७ व ९ वर तंत्रज्ञ म्हणून नीवड मुलाखतीत गेलो असताना स्टेशन डयरेक्टर्रने मला चक्क सांगितले होते "तू पहिला भारतिय आहेस की प्रमाणपत्र धारक नसून एक अनुभवी तंत्रज्ञ आहेस. " ह्या करता मनोगता वरील "नशीब चे भाग " जरुर वाचा.