पेनींचा किंवा पेन्सचा हे प्रयोग योग्य आहेत यात काहीच शंका नाही. परंतु पेन्स हा रूढ मराठी शब्द आहे असे गृहीत धरले तर, आणि फक्त तरच, पेन्सांचा हा शब्द चालेल. नमुना म्हणून--'माझ्याकडे विविध विषयांवरचे अनेक डेटे जमा झाले आहेत. त्या डेट्यांची वर्गवारी करण्याचा उद्योग मी सध्या करीत आहे.' ज्याला इंग्रजी समजत नाही, किंवा कळत असून डेटा हे मुळातच अनेकवचन आहे हे माहीत नाही, त्याच्या दृष्टीने वरील वाक्य व्याकरणशुद्ध म्हणावे लागेल. त्यासाठी डेटा हा मराठीने स्वीकार केलेला रूढ शब्द असायला हवा, आणि तसा तो आहेच.
इंग्रजीत Keats's पोएम्स, Jones's बुक, St James's स्क्वेअर, अलेक्झांडर Dumas's दि थ्री मस्केटिअर्स अशा प्रकारे अनेकवचनी नावांना षष्ठीचा प्रत्यय लावताना Keats' असे 'व्याकरणशुद्ध' न लिहिता प्रत्ययापूर्वी अनेकवचन तसेच ठेवता येते. पेन्सांचामध्ये तसेच काहीसे झाले असावे असे समजावे.