एडिंग्टनला या सफल प्रयोगानंतर एका वार्ताहरानें प्रश्न विचारला होता कीं फक्त तिघांनाच सापेक्षतवाद कळला. तेव्हां एडिंग्टननें प्रश्नकर्त्यास विचारलें कीं हा तिसरा कोण? अर्थात ही वदंता आहे असेंच समजलें जातें. कारण या संभाषणाचा विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाहीं.

मीराताई आणि मिलिंदजी, आपल्याशीं मीं सहमत आहे परंतु माझ्या माहितीच्या स्त्रोतांत जसें आढळलें तस्सेंच मीं लिहिलें. जरी पटलें नाहीं तरी त्यांत फरक करणें मला बरोबर वाटलें नाहीं. अर्थात तसा मीं अल्पशिक्षितच. माहितीपटाचा आधार मीं घेतलेला आहेच. स्रोत क्र. ५. किंबहुना माहितीपट पाहात असतांनाच मेंदूंत या लेखाचा किडा वळवळला. रंजकतेचें श्रेय त्या माहितीपटाला आहेच.

महेशजी, अद्वैतुल्लाखान, मृदुलाताई, मीराताई, मिलिंदजी, देशमुखसाहेब, कुशाग्र आणि काळापहाड, आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल आपणां सर्वांना धन्यवाद.

सुधीर कांदळकर