झाडे फक्त एकच गुन्हा करतात

आभाळभर हात पसरुन,

आयुष्यभर पाउस मागतात

आणि तोडणारांच्या चुलीसाठी

पानोपानी वाढत जातात