!!! अनामिक !!! येथे हे वाचायला मिळाले:
जवळ जवळ सगळ्या ब्लॉग्सवर २००९ ला निरोप आणि नववर्षाच्या शुभेच्छांचा सुळसुळाट झालाय. मी ठरवलंही होतं की आपण असं काही लिहायचं नाही , परंतू आताच अपर्णाचा ब्लॉग वाचला आणि मागे पडलेलं एक संपूर्ण वर्ष डोळ्यासमोरून गेलं. २००९ ने खूप खूप आनंदी क्षण दिलेत तर काही मोजकेच दु:खाचे क्षणही दिलेत... गोळाबेरीज करता २००९ खूप लकी ठरलं म्हणायला हरकत नाही.