आपल्या तिन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद.

एडिंग्टन आणि आईनस्टाईन यांचें महत्त्व मांडणें हा माझ्या लेखाचा उद्देश आहेच.

माझे सर्व मूळ संदर्भ चाळून पाहिले. अगदीं माहितीपटदेखील पुन्हां पाहिला. फक्त जर्मन असें म्हटलेलें आहे. हिटलर, नात्झी, गेस्टापो इ. शब्द पुनर्लेखन करतांना माझ्याकडून अनवधानानें वापरले गेले आहेत. इतिहासाचँ फारसें ज्ञान नसल्यामुळें. गफलतीबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतों. ९३ जणांच्या सहीचा जाहीरनामा, आईनस्टाईनला पत्रपेटीकडे जाऊं न देणें  इ. बाबी मात्र माझ्या संदर्भांत जशाच्या तशा आहेत. 

मॅक्स प्लांकला जर्मन अधिकाऱ्यांनी 'या ज्यू माणसाचा उपयोग काय' असें विचारलें हेंहि माझ्या संदर्भांत आहे. नात्झी हा चुकीचा शब्द माझा. ज्यूंचा छळ नसला तरी तेव्हां ज्यूविरोध होता. 'सापेक्षवाद सिद्ध झाला तर सारे जर्मन मला जर्मन म्हणतील व सारे फ्रेंच मला ज्यू म्हणतील व चुकीचा निघाला तर सारे फ्रेंच मला जर्मन म्हणतील व सारे जर्मन मला ज्यू म्हणतील' हें आईनस्टाईनचें तत्कालीन विधानही सुप्रसिद्ध आहे.  

दुसरे म्हणजे आईनस्टाईनचे  कॉस्मॉलोजिकल समीकरण किंवा त्याने क्वांटम मेकॅनिक्सवर घेतललेले आक्षेप चुकीचे निघाले.
कॉस्मॉलॉजिकल समीकरणात आवश्यकता नसताना केवळ विश्व प्रसरण किंवा आकुंचन पावू नये यासाठी त्याने कॉस्मॉळोजिकल कॉन्स्टंट ठेवला तो विश्व प्रसरण पावत असल्याचे लक्षात आल्याने पुढे चुकीचा निघाला.  गतीच्या नियमांमध्ये न्यूटनचे सिद्धांत हे चुकीचे नसून आईनस्टाईनच्या सिद्धांताची स्पेशल केस आहे हे खरे आहे.

ग्रेट जनरल हें मत ऍसिमॉव्हचें आहे. तें जसेंच्या तसें मांडलें आहे. ऍसिमॉव्हच्या त्या लेखाचें नांवच 'ग्रेट जनरल' असें आहे आणि तॉ लेख पूर्णतयः आईनस्टाईन आणि त्यच्या कार्यावरच आहे. हबल रेड शिफ्ट आणि विश्वाचें प्रसरण ही संकल्पना १९९० ची. माहिती विकीपेडियावर उपलब्ध आहेच. http://en.wikipedia.org/wiki/Cosmological_constant या दुव्यावर. आणि ऍसिमॉव्हची लेख १९८३ चा.

बोहर हायजेनबर्गच्या सिंद्धांतावर आईनस्टाईननें जिवाच्या आकांतानें बरेच आक्षेप घेतले होते आणि ते सर्व ओपनहायमरनें खोडून काढले होते असें मीं हल्लींच कुठेंतरी वाचलें होतें. पण दुर्दैवानें कुठें तें नक्की आठवत नाहीं आणि माझें तें टिपण हरवलें आहे. बहुधा शास्त्रज्ञांचा विचित्रपणा अशा कांहींतरी नांवाचें पुस्तक होतें. बहुधा लेखक बाळ फोंडके असावेत. तो संदर्भ मिळाल्यास आनंद वाटेल.

असो. वेळ देऊन लेख वाचून त्यावर मनन केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.

सुधीर कांदळकर