हबल रेड शिफ्ट आणि विश्वाचें प्रसरण ही संकल्पना १९९० ची. माहिती विकीपेडियावर उपलब्ध आहेच. http://en.wikipedia.org/wiki/Cosmological_constant या दुव्यावर. आणि ऍसिमॉव्हची लेख १९८३ चा.

हे चुकीचे आहे. रेड शिफ्ट १९१७ साली वेस्टो स्लिफर याने पहिल्याने मोजली. त्यानंतर एडवीन हबलने सुमारे १० -१२ वर्षे निरीक्षणे करून १९२९ मध्ये रेड शिफ्टबद्दलचा "हबल नियम" मांडला इथे वाचा.

आईनस्टाईनने कॉस्मॉलॉजिकल समीकरण १९१५ मध्ये मांडले तेव्हा विश्व स्थिर ठेवण्यासाठी कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट त्यात ठेवला. तो गणिताची आवश्यकता म्हणून आलेला नव्हता. १९२२ मध्ये रशियन गणिती अलेक्झांडर फ्रीडमनने आईनस्टाईनची चूक दाखवून दिल्यावर आईनस्टाईनने फ्रीडमनचे गणितच चुकले आहे अशी टीका केली. गणित बरोबर असल्याचे सांगितल्यावर माफीनामा लिहून दिला. तो देतानाही फ्रीडमनचे निष्कर्ष भौतिक जगात निरर्थक आहेत असे वाक्य आधी घातले होते पण नंतर हा माफीनामा असल्याचे लक्षात आल्यावर काढले.

 फ्रीडमनचे १९२६ मध्ये अकाली निधन झाले. १९२७ मध्ये बेल्जियन धर्मगुरू आणि गणिती जॉर्जेस लेमित्रे याने स्वतंत्रपणे आईनस्टाईनची चूक दाखवली. पण आईनस्टाईनने लेमित्रेचे संशोधन काही वर्षे प्रसिद्धच होऊ दिले नाही. त्या क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून आईनस्टाईनच्या संमतीशिवाय त्याकाळी प्रसिद्ध होणे शक्य नव्हते.

पुढे आईनस्टाईन जेव्हा अमेरिकेत आला तेव्हा एडवीन हबलने विश्व प्रसरण पावत असल्याचे पुरावे दाखवले आणि त्यानंतर त्याने आपले सुधारित समीकरण प्रसिद्ध केले.

विनायक

जाता जाता - ज्यूंबद्दलचा द्वेष युरोपात अगदी शेक्सपियरच्या काळापासून दिसतो. "मर्चंट ऑफ व्हेनिस" मधले "पाउंड ऑफ फ्लेश" मागणारे शायलॉकचे खलनायकी पात्र प्रसिद्धच आहे.  १९१९ मधला जर्मनी अन्यायी, जुलुमी नव्हता तर पराभूत आणि लाचार होता हे मान्य केलेले दिसते पण १९१९ मध्ये अर्ध्या जगावर जुलुमाने राज्य करणारे इंग्लंड लोकशाहीवादी कसे? कथेला धार आणण्यासाठी इतिहासविरुद्ध अश्या कपोलपल्पित गोष्टी आपण आणल्याने कथेचे मूल्य कमी झाले आहे.

ऑर्थर एडिंग्टन यांनी  सी. व्ही. रामन यांचे पुतणे आणि पुढे नोबेल पारितोषिक मिळालेले भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी अनुद्गार काढल्याने ते इंग्लंड सोडून अमेरिकेत कायमचे स्थाईक झाले असे वाचले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञाला देश नसतो वगैरे उच्च तत्त्वे फक्त गोऱ्या रंगाच्या शास्त्रज्ञांनाच लागू होतात असे वाटते.

(वरील सर्व विवेचन सायमन सिंग यांनी लिहिलेल्या "बिग बँग: ओरिजीन ऑफ युनिव्हर्स"या  पुस्तकातून घेतले आहे.