हबलनें जें शोधलें तें फ्रीडमननें १९२२ सालींच शोधून काढलें होतें. परंतु अमेरिकेचा हारवर्ड रॉबर्टसन आणि ब्रिटिश गणितज्ञ ऑर्थर वॉकर यांनीं विश्वाचीं तशींच संकल्पना मांडेपर्यंत अमेरिकेंत अनेकांना फ्रीडमनचें वा हबलचें कार्य ठाऊकही नव्हतें: मीं वापरलेला संदर्भ क्र. १.
१९४८ सालीं बिग बँग ला समांतर अशी स्थिर विश्ववादी सिद्धांत डॉ. फेड हॉयेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीं मांडला होता. कालांतरानें तो मान्य करणाऱ्या शास्त्रज्ञांची संख्या कमी होत गेली. १९६० मध्यें मार्टीन रायल (हा डॉ. हॉयेल यांचा एके काळचा सहकारी होता) आणि त्याच्या सहकाऱ्यांनीं 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅक्ग्राउंड रेडिएशन' शोधून काढेपर्यंत स्थिर विश्वाची संकल्पना पूर्णपणें नाकारली गेली नव्हती.
आयझॅक ऍसिमॉव्ह जरी जन्मानें रशियन होता तरी बालपणापासून तो अमेरिकेंतच राहिला होता. त्याचें मीं उद्धृत केलेलें विधान १९८३ प्रसिद्ध झालेल्या निबंधसंग्रहांत आहे. हे निबंध त्याहिपूर्वीं प्रसिद्ध झालेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या निवडक निबंधांपैकीं आहेत.
असो. वादे वादे जायते ....... या न्यायानें बोध आणि करमणूक दोन्हीं झालीं. आनंद वाटला. आपला सध्याचा आक्षेप हा आयझॅक ऍसिमॉव्हच्या विधानाला आहे आणि त्याबद्दल मीं योग्य तें स्पष्टीकरण दिलेलें आहे. त्यामुळें माझ्यापुरती तरी ही चर्चा इथेंच थांबवणें पसंत करतों.
सुधीर कांदळकर