बऱ्याच पेपरवाल्यांच्या बाबतीत असा अनुभव आम्हालाही आलाय अर्थात इतका टोकाचा नाही. पण त्यांना पेपरबिलाची काळजी नसते हे मात्र खरे. आमच्या सध्याच्या पेपरवाल्याला दोन दोन महिने बिल नेण्याची शुद्ध नसते.अनेकवेळा आम्ही बरेच दिवस गावाला जाणार असतो तेव्हा त्याला अगोदर कळवतो तरीही गावाहून आल्यावर पेपरांचा भारा दारात पडलेला असतो. त्याबद्दल तक्रार केल्यास "काही हरकत नाही बिल देऊ नका" असे सांगतो.हे गूढ काय आहे कळत नाही.