आपला सध्याचा आक्षेप हा आयझॅक ऍसिमॉव्हच्या विधानाला आहे आणि त्याबद्दल मीं योग्य तें स्पष्टीकरण दिलेलें आहे.

माझा आक्षेप १. इतिहासातातील चुकीच्या उल्लेखांबद्दल आणि २. आईनस्टाईनचे काहीच चुकले नाही या असिमॉव्ह यांच्या आपण उद्धृत केलेल्या विधानाबद्दल होता. त्यातला पहिला भाग आपण मान्य केला आहेच. दुसऱ्या भागाबद्दल मी माझे मत मांडले आहे.

फक्त आपली इतिहासाबद्दलची चूक मान्य करतानाच आपण एक नवीन चूक केली आहे. ती अशीः

हबल रेड शिफ्ट आणि विश्वाचें प्रसरण ही संकल्पना १९९० ची. माहिती विकीपेडियावर उपलब्ध आहेच. http://en.wikipedia.org/wiki/Cosmological_constant या दुव्यावर. आणि ऍसिमॉव्हची लेख १९८३ चा.

यावर माझे उत्तर असे.

हे चुकीचे आहे. रेड शिफ्ट १९१७ साली वेस्टो स्लिफर याने पहिल्याने मोजली. त्यानंतर एडवीन हबलने सुमारे १० -१२ वर्षे निरीक्षणे करून १९२९ मध्ये रेड शिफ्टबद्दलचा "हबल नियम" मांडला इथे वाचा.

हे पुरेसे स्पष्ट आहे. दुवा उघडून वाचला तर सगळे समजेल.

यावर आपला युक्तिवाद असा.

हबलनें जें शोधलें तें फ्रीडमननें १९२२ सालींच शोधून काढलें होतें.  

इथे गोंधळ आहे. फ्रीडमन (आणि लेमित्रे) हा गणिती. त्याने १९२२ मध्ये आईनस्टाईनच्या गणितातली चूक दुरुस्त केली. आईनस्टाईनच्या गणितानुसार विश्व केवळ स्थिर राहू शकत होते तर फ्रीडमन - लेमित्रे यांच्या गणितामध्ये विश्व आकुंचन, प्रसरण पावणे किंवा स्थिर राहणे अश्या तीनही शक्यता गृहीत धरल्या होत्या.

हबल हा आकाशनिरीक्षण करणारा खगोलशास्त्रज्ञ. हबल तसेच हेन्रीएटा लेव्हिट आणि इतर शास्त्रज्ञांनी आकाशनिरीक्षणे करून आईनस्टाईनच्या गणितानुसार विश्व स्थिर राहत नसून फ्रीडमन - लेमित्रे यांनी गृहीत धरलेल्या शक्यतेनुसार प्रसरण पावते आहे असे दाखवले. तोच १९२९ मधला "हबल नियम".

 परंतु  अमेरिकेचा हारवर्ड रॉबर्टसन आणि ब्रिटिश गणितज्ञ ऑर्थर वॉकर यांनीं विश्वाचीं तशींच संकल्पना मांडेपर्यंत अमेरिकेंत अनेकांना फ्रीडमनचें वा हबलचें कार्य ठाऊकही नव्हतें: मीं वापरलेला संदर्भ क्र. १.

इथेही गोंधळ आहे. हबल अमेरिकेत जन्मला, अमेरिकेत संशोधन केले. असे असताना अमेरिकेत त्याचे कार्य माहिती नाही असे कसे होईल? आणि किती लोकांना त्याचे कार्य माहिती आहे यावर त्याच्या कार्याचे महत्त्व कसे ठरते? फ्रीडमनचे कार्य अगदी लेमित्रेलाही माहिती नव्हते. आईनस्टाईननेच लेमित्रेला फ्रीडमनबद्दल सांगितले.

आपण आधी दिलेला विकीचा दुवा आणि इथला संदर्भ क्र. १ उघडत नाहीत. विकीचा दुवा गूगलमध्ये चिकटवला तेव्हा हे मिळाले. या दुव्यामध्ये १९९८ मध्ये "विश्व त्वरण गतीने प्रसरण पावत असल्याचे निरीक्षणांवरून लक्षात आले. " असे वाक्य आहे त्यावरून आपण

हबल रेड शिफ्ट आणि विश्वाचें प्रसरण ही संकल्पना १९९० ची. माहिती विकीपेडियावर उपलब्ध आहेच. http://en.wikipedia.org/wiki/Cosmological_constant या दुव्यावर. आणि ऍसिमॉव्हची लेख १९८३ चा.

असा निष्कर्ष काढला आहे त्यात घोळ आहे. १९२९ मध्येच विश्व प्रसरण पावते असे सिद्ध झाले. आता ते एकसमान वेगाने प्रसरण पावते की त्वरण गतीने? हा प्रश्न होता,  त्याचे उत्तर १९९८ मध्ये त्वरण गतीने असे मिळाले असा या वाक्याचा अर्थ आहे. हबल रेड शिफ्ट आणि विश्वाचे प्रसरण ही कल्पनाच १९९० ची आहे असा नाही.

१९४८ सालीं बिग बँग ला समांतर अशी स्थिर विश्ववादी सिद्धांत डॉ. फेड हॉयेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीं मांडला होता. कालांतरानें तो मान्य करणाऱ्या शास्त्रज्ञांची संख्या कमी होत गेली.  १९६० मध्यें मार्टीन रायल (हा डॉ. हॉयेल यांचा एके काळचा सहकारी होता) आणि त्याच्या सहकाऱ्यांनीं 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅक्ग्राउंड रेडिएशन' शोधून काढेपर्यंत स्थिर विश्वाची संकल्पना पूर्णपणें नाकारली गेली नव्हती.

स्थिर विश्व सिद्धांत १९४८ साली जरी मांडला गेला तरी विश्व प्रसरणाचे पुरावे १९२९ मध्येच मिळाल्याने हे बाळ तसे जन्मापासून ऍनिमिकच होते.  त्यामुळे ते अखेर मेले यात अश्चर्य नाही.

असो. माझ्या सर्व प्रतिसादांमध्ये मी माझी भूमिका पुराव्यांनिशी स्पष्टपणे मांडली आहे असे मला वाटते. सार्वजनिक दृष्टीने उपयोगाचे असे मुद्दे आता राहिले नाहीत त्यामुळे माझा या विषयावरचा हा शेवटचा प्रतिसाद.

विनायक