काळाला व स्थलाला गुरुत्वाकर्षणाने येणारी वक्रता वीस मजली इमारतीच्या तळमजल्यावर ठेवलेल्या घड्याळ्याच्या सेकंदकाट्याने घेतलेला 'एका टिक टिक'चा म्हणजे 'तळमजल्यावर समजल्या जात असलेल्या एका सेकंदाच्या अर्थाच्या' व विसाव्या मजल्यावर त्या अर्थात पडणाऱ्या बदलामधील फरकावरूनही सिद्ध करण्यात आली.
तळमजल्यावरील सेकंद अर्थातच दीर्घ होता तर विसाव्या मजल्यावरील सेकंद किंचित लवकर संपला. हे मोजण्याचे उपकरण मुद्दाम तयार केलेले होते.
अस्मादिकांना एकदा 'आपले विश्व व आपले देव' या विषयावर एक व्याख्यान देण्याचा सन्मान मिळाला होता. त्यात ही चकीत करणारी माहिती सांगून आम्ही श्रोत्यांना जरा इंप्रेस केलेले होते. आता तोच विषय इथे वाचल्यावर 'मलाही हे सर्व माहीत आहे' हे सांगण्याचा मोह व त्याचे बायप्रॉडक्ट म्हणजे 'शहाणा समजतो' ही प्रतिक्रिया न टाळण्यासारखी आहेच.
मात्र आपला लेख आवडला. मध्ये मध्ये जरा लिंक तुटल्यासारखी वाटत होती. पण उत्तम शब्दनिवड व सोपी शब्द निवड!
धन्यवाद!