श्रीयुत परेश,
आपले मनोगतावर हार्दिक स्वागत असो. तुम्ही लिहिलेले प्रवासवर्णन दोनच भागात संपवू नका. तुमची लिहिण्याची शैली ओघवती आहे आणि निरीक्षण छान आहे. तेव्हा सर्व सविस्तर लिहा. क्रमशः लिहिण्याने उत्सुकता वाढेल. सर्व अभिप्राय त्यानंतर देऊ.
सोबत जर्मनीच्या दोन नकाशांचे संकेतस्थळे देत आहे. तुमच्या कडे असे संकेत स्थळ उपलब्ध असल्यास, आणि तुम्ही काढलेली बर्लिनची छायाचित्रे असल्यास तीहि देऊ शकाल.
जर्मनीमधील शहरे दाखवणारा नकाशा इथे टिचकी मारा म्हणजे दिसेल.
जर्मनीमधील आगगाडी मार्ग दाखवणारा नकाशा या स्थळाला भेट द्या म्हणजे दिसेल.
आणखी एक नकाशा - इथे जास्त तपशील आहे. आपण नमूद केलेले लायमन हे गाव कोठे आहे?
माझ्या आगाऊपणाला क्षमा करा.
कलोअ,
सुभाष