एका बस स्टॉपवर एक बाप आणि त्याचा लहान मुलगा उभा असतो. बाप सारखा म्हणत असतो, "संदीप, मन शांत ठेव, संदीप, वेड्यासारखा वागू नकोस, संदीप, आता लवकरच घरी जाऊया हं, मग तुला बरं वाटेल" वगैरे. त्यावर शेजारी उभा असलेला एक माणूस म्हणतो, "तुमच्या मुलाला तुम्ही काय म्हणताय ते कळतंय का? " त्यावर तो बाप म्हणतो, "माझ्या मुलाचं नाव अभिजीत आहे. संदीप मी आहे."