वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
"त्या" ब्लॉग मालकाचं काहीच प्रत्युत्तर न आल्याने मी माझी कविता खाली देत आहे. ती माझ्या याच ब्लॉग वर देखील आहे दुसऱ्या एका पोस्ट मध्ये. किंबहुना या ब्लॉगवरचं ते माझं पहिलंच पोस्ट होतं. अर्थात ब्लॉगवर मी ती खूप उशिरा टाकली. ती कधी आणि कशी लिहिली गेली ते तुम्हाला ती पोस्ट वाचून कळेलच. थोडक्यात सांगायचं तर ती मी आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या "संकल्प" या त्रैमासिकासाठी २००८ च्या मध्यावर लिहिली. नंतर ती म.टा. च्या ऑनलाईन अंकात देखील छापून आली. २००८ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यात महाराष्ट्रात/मुंबईत घडलेल्या स्थानिक दंगली/अतिरेकावर ...