स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
गवार कितीला दिली गं? ८ रुपये पाव ताई. बापरे, ८ रु. पाव! ७ नि दे ना! ताई न्हाई परवडत, तुम्हाला म्हणून ७.३० रू पाव ने देते. घ्या ताई. माल एकदम चांगला आहे. ताजी भाजी आहे एकदम. असे संभाषण होते ते भारतात. दररोज जर का तुम्ही ठराविक भाजीवालीकडून भाजी घेत असाल तर तुमचा संवाद वाढतो. मुले किती? कोणत्या ऑफीसला जाता? साडी किती छान आहे ताई तुमची असे करत करत तुमच्या जीवनातला भाजी व भाजीवाली हा एक अविभाज्य घटक ठरून जातो. इथे तसे नाही. इथे म्हणजे अमेरिकेत. सर्व दुकानातून भाजी आकर्षकरित्या मांडलेली असते. स्वच्छ सुंदर भाजी. कोणतीही कीड नसलेली. माती न ...