आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:



"अवतार' हा जेम्स कॅमेरॉनने टायटॅनिकनंतर १२ वर्षांनी केलेला चित्रपट पाहावा, की पाहू नये असा प्रश्नच पडण्याची गरज नाही. चित्रपटगृहात जाऊन अनुभवण्याचे, त्यांच्या दृश्यानुभवाने आपल्याला थक्क करून सोडणारे जे विशेष चित्रपट असतात, त्यातला हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. त्यामुळे तो पाहावा हे तर उघड आहे. आता हे देखील खरं, की ज्या प्रमाणात त्याचं मार्केटिंग करण्यात आलंय त्याकडे पाहून हे स्पष्ट आहे की, अवतारचा प्रेक्षक हा मी त्याबद्दल काय मत व्यक्त करतो हे जाणून घेण्यासाठी तो पाहायचा राहणार नाही. त्याने एक तर तो आधीच पाहिलेला असेल, किंवा तो ...
पुढे वाचा. : कॅमेरॉनचा अवतार