की जरा अजून वाट बघावी, त्यामुळे मी न राहवून सगळे भाग एकदम वाचून काढले. काही प्रसंगात डोळ्यात पाणी आलं. अश्या प्रकारचे अमेरिकन भारतीयांचे जीवन रेखाटणारे लेखन क्वचितच वाचण्यात आले आहे. नेहमी अरेरावी करणारे, बॉय/गर्लफ्रेंडसोबत मस्ती करणारे असेच काहीसे चित्रण चित्रपट आणि नकारात्मक लिखाणातून जाणवले आहे. ह्या मुलांना भारताविषयी काहीही वाटत नाही असं काहीसं.... वगैरे...
पण जो समजूतदारपण तुम्ही दाखवला तसाच सगळे भारतीय दाखवतात का ? ओफ्राचा तो 'शो' मी सुदैवाने बघितला होता, तेन्व्हा मलाही धक्का बसला होता. अश्या मानसोपचार तज्ञांची भारतात आणि सर्वत्र आवश्यकता आहेच.
मुलांना वाढवताना काय करायला नको ह्याचे बरेच सल्ले 'न मागताही' मिळत असतात पण काय करायला हवे हे खूप कमी वेळा कळते, त्यामुळे तुमचे लेखन मला खूप आवडले आणि पटलेही.
खूप खूप धन्यवाद.