हिंदी संपर्कभाषा आहे आणि ज्ञानभाषाही. ती राष्ट्रभाषा आहे किंवा नाही हा मुद्दा फारच गौण आहे. (हिंदी राष्ट्रभाषा नाही हा शोध काहींना नव्यानेच लागला आहे. त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा नाही.) पण मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी हिंदीविरोध करायलाच पाहिजे का?
हिंदी राष्ट्रभाषा नसली तरी ती एक चांगली, उपयोगी आणि मराठीभाषकांना सहज
शिकण्याइतपत सोपी भाषा आहे, ती जरूर शिकावी आणि योग्य तेव्हा वापरावी. जो
आशय मराठी शब्दांनी स्पष्ट करता येत नाही, त्यासाठी हिंदीतून शब्द आयात
करावेत आणि ते मराठीत मुरवावेत. इतर भारतीय भाषांतून आयात केलेले
संपूर्णपणे अपरिचित शब्द आत्मसात करणे मराठीभाषकांना फार जड जाते.
शुद्ध मराठींशी ह्याबाबतीत सहमत आहे.