पूर्वी एकत्र कुटुंबात घरातील ज्येष्ठ मंडळी तरुणांच्या व बालकांच्या समुपदेशनाचे काम अप्रत्यक्ष रीतीने करीत असत. आता ती परिस्थिती उरलेली नाही. अशा वेळी व्यावसायिक व व्यापक प्रमाणावर पालकांचे व मुलांचे समुपदेशन आवश्यक वाटते. विविध सामाजिक संस्था, शाळा, शैक्षणिक संस्था, जागरूक नागरिक ह्या कामी पुढाकार घेऊ शकतात. मुलांकडून नेत्रदीपक कामगिरीची अपेक्षा बाळगताना वास्तवाचे भान सुटता कामा नये, त्यांच्या चिमुकल्या मनांवर ताण येऊ नये ह्यासाठी पालकांनाच सतर्क राहणे गरजेचे आहे आणि ही सतर्कता अशा समुपदेशनातून जोपासली जाईल. तसेच सर्वच शाळा, कॉलेजेस मधून नापास विद्यार्थ्यांना आश्वासक ठरणारे, उमेद दाखविणारे व निकडीचे समुपदेशन अनिवार्य आहे. अशा मुलांच्या पालकांनाही समुपदेशन घेणे सक्तीचे करावे. शिवाय पालकांनी मुलांना एखादा चित्रपट पाहताना तो केवळ एक भास आहे, एक कथा आहे ह्या गोष्टीची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

एका ज्वलंत प्रश्नाला आपण हात घातलात त्या बद्दल धन्यवाद!