दिवाकरराव,
आपले काव्य 'दरखास्त' या शब्दातील अलामत व 'व्यक्त' या शब्दातील 'त' ला जोडला गेलेला अर्धा 'क' सोडला तर तंत्रशुद्ध आहे असे वाटते. आपल्या चार ओळींमध्ये अलामतीची गरजच नाही व तंत्रशुद्धतेचीही. कारण ती काही गझल नाही. तरीही ओळी बऱ्याच शुद्ध आहेत.
मात्र 'व्यक्त' हा शब्द वापरल्यामुळे ते सदरहू गझलेप्रमाणे झाले आहे.
मिलिंदराव,
आपण एक सीनियर गझलकार असून मध्येच वरील गझलेप्रमाणे 'सुंदर आशयाला' तंत्राची झालर फिट्ट बसवायला का कंटाळता?
बाकी चैतन्यचे मत मला पटते. पांथस्थ मध्ये थ हवा. तसेच, या गझलेत 'थ' घेतल्यामुळे फरकही पडणार नाही कारण ही अकारान्त स्वरकाफियाची गझल आहे.
-बेफिकीर