चैतन्य,
मार्मिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  1. 'उच्चा'रवाने की ''उच्चरवाने : हा मुद्दा अजून एका मनोगतीनेही उपस्थित केला आहे. मात्र ती व्यक्ती जाहीर चर्चेत सहभागी होऊ इच्छित नसल्याने तिचा नावानिशी ऋणनिर्देश करीत नाही. जालावर शोध घेतल्यास दोन्ही रूपे सापडतात. कोणते बरोबर, कोणते चूक मला ठाऊक नाही. मी 'गुंजारव' प्रमाणे उच्चारव वापरले. शब्दकोशानुसार रव=आवाज , noise. उदा. पदरव=पाउलांचा आवाज. आरव=(कोंबड्याचे) आरवणे, crowing. आजवरच्या वाचनात माझा असा समज झाला होता की अर्थछटेचा विचार केल्यास संधि/समासात (व्याकरणदृष्ट्या जे काही असेल ते) रव हे एखाद्या क्रियेसोबत आपोआप होणाऱ्या आवाजासाठी वापरले जाते  व आरव हे मुखा/गळ्यावाटे संपर्कासाठी जाणून-बुजून काढलेल्या ध्वनीसाठी. म्हणून मी 'उच्चारव' हा शब्दप्रयोग वापरला. अर्थात हा केवळ माझा समज (impression) आहे, ह्याच्या पुष्ट्यर्थ माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, संदर्भ नाही. अजून एक शक्यता म्हणजे उच्चार+रव=उच्चारव अशीही व्युत्पत्ती असू शकेल. व्याकरणाचे जाणकार ह्यावर खुलासा करू शकतील.
  2. पांथस्थ की पांथस्त : पांथस्थच बरोबर आहे. माझी इथे चूक झाली आहे व हा शेर गाळायला हवा.