तुमची मतं खूप चांगली आहेत, पण सध्याचे युग हे स्पर्धेचं युग आहे यात प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याची केवळ गुणात्मक प्रगती हवी आहे. अशावेळी विद्यार्थी भावनिक दडपणाखाली वावरतो हे पालकांच्या लक्षात येतच नाही.शासनाच्या आडमुठे धोरणांमुळेही बहुसंख्य विद्यार्थी हतबल झालेले आपण पाहतो.कुटुंबाचा  स्तर गुणांवर  तोलणारे महाभाग आपल्या सभोवती वावरताना आपण नेहमी पाहतो अशावेळी पालकांनी काय करावे?