'निदिध्यास'चा ना 'निद्रा'शी संबंध ना 'नित्य'शी! ध्यै-ध्यायति(१ प.)या संस्कृत धातूला नि हा उपसर्ग लागून निध्यै हा धातू तयार होतो. त्याचे प्रत्ययापूर्वीचे इच्छार्थक रूप होईल निदिध्यास्. अर्थ-- ध्यान धरण्याची इच्छा असणे/करणे; मनात इच्छा धरून विचार करणे.. या रूपापासून झालेले भाववाचक नाम, निदिध्यास.
पा-पिबति पासून जसे पिपासा(स्त्रीलिंगी) हे इच्छार्थक नाम होते तसेच निध्यै पासून निदिध्यास(पुल्लिंगी). अशीच रूपे ज्ञा-जिज्ञासा, जि-जिगीषा(जगण्याची इच्छा), कृ-चिकीर्षा(करण्याची इच्छा), तॄ(त ला दीर्घ ॠकार)-तितीर्षा(तरंगण्याची/ओलांडून जाण्याची इच्छा), वगैरे. फरक एवढाच आहे की ही सर्व रूपे स्त्रीलिंगी आहेत आणि निदिध्यास पुल्लिंगी. --अद्वैतुल्लाखान.