मोल्सवर्थने 'च'चा उच्चार कसा करावा याबद्दल २६५ व्या पानावर सांगितले आहे. त्यावरून मला असे वाटते की जेव्हा उच्चार सीएच् किंवा टीएसएच ने दाखवला असेल तेव्हा उच्चार च्य असा करावा आणि टीएस् ने दाखवला असेल तर चमच्यातल्या दन्ततालव्य च प्रमाणे करावा. त्यानुसार पाहता नारळाच्या चवीतल्या च चा उच्चार टीएस् ने दाखवला असल्याने तो दन्ततालव्य च असा करावा करावा च्य नाही.
म्हणजे चाऱ्यातला च सारखा, चारातल्या च सारखा नाही. (चू.भू.द्या̱.घ्या.)