हसतमुखानें आल्या दिवसाला सामोरें जायचें हें खरें. एखादा छंद असला तर दुःखाची तीव्रता कमी होते. संगीत, साहित्य कला इ. इतकें जगड्व्याळ आहे कीं आस्वाद घ्यायला एक आयुष्य पुरणार नाहीं. मग अशा दुःखाला वेळ मिळत नाहीं. कशांत तरी मन रमवा. अन्यता नात शाळाकॉलेजांत अडकल्यावर पुन्हां पोकळी जाणवेल.
असो. उपदेश करणें सोपें आहे. लेख मात्र वाचनीय, त्यांतले अनुभव हृद्य आणि आरस्पानी, प्रामाणिक आहेत.
सुधीर कांदळकर