वरील चर्चा आवडली. संजय क्षीरसागरांचें शाळा बदलणें आणि फाईन आर्टसाठीं चिं ना पाठिंबा देणें याबद्दल अभिनंदन.
बरेच शिक्षक शाळेंत वाईट रीतीनें शिकवतात. मुलांच्या शैक्षणिक अडचणी सोडवीत नाहींत. हेच शिक्षक खाजगी क्लासेसमध्यें मात्र चांगलें शिकवतात. कांहीं शिक्षक पोटाची खळगी भरायला शिकवतात. त्यांना शिकवायची आवड नसली तरी. मग मुलांनीं काय करायचें?
आणखी एक मुद्दा असा: कांहीं वेळां मुलांचा कल - ऍप्टिट्यूड एकीकडे असतो व उपजत बौद्धिक ठेवण दुसरीकडे. बहुधा हें इतरांच्या - खासकरून आईबाबांच्या वा सहाध्यायींच्या मतप्रवाहाच्या प्रभावामुळें होतें. (अर्थात असें कमी वेळां होतें कारण जें येतें त्याबद्दल आवड व येत नाहीं त्याबद्दल नावड असते.) मग चुकीचा विषय निवडल्यामुळें पदरीं अपयश पडतें. यासाठीं वैज्ञानिक पद्धतीनें माईंड मॅपिंग करून विद्यार्थ्याची बौद्धिक ठेवण तपासून घेतली पाहिजे. यासंबंधीं माहिती महाजालावर उपलब्ध आहे.
सुधीर कांदळकर