नक्की गॅसचा तुटवडा आहे की सिलेंडर्स चा? गॅसचा तुटवडा असेल, तर जोडण्या कमीअधिक करून काही फरक पडणार नाही. गॅस वापरायचा तेवढाच वापरला जाणार.
सिलेंडर कमी असतील तर ते नव्याने बनवता येतील की.
गॅसचा तुटवडा असल्यासः
१) सर्व शहरांमध्ये CNG उपलब्ध करणे.
२) वाहने, किंवा ज्या ज्या ठिकाणी इतर पर्याय आहेत, तेथे LPG वापरास बंदी घालणे.
सिलेंडरचा तुटवडा असल्यास
१) अधिक सिलेंडर बनवणे (आवश्यकत पडल्यास ग्राहकांकडून अधिक अनामत रक्कम घेणे).
२) एका घरात २-३ पेक्षा जास्ती सिलेंडर न देणे (२ की ३ ते ठरवा)
३) यापेक्षा सोपे म्हणजे, केवळ २ ठिकाणी लावायचा म्हणून कोणी नवीन जोडणी घेत असेल तर, एकाच जोडणीत एकापेक्षा अधिक रेग्युलेटर्स उपलब्ध करून देणे. म्हणजे एक सिलेंडर स्वयंपाकाला तर दुसरा गीझरला वापरता येईल.

हे सर्व होई पर्यंत तात्पुरता उपाय म्हणून काही काळ एकाच कुटुंबाला (नवीन) दुसरी जोडणी देणे स्थगित करावे. (म्हणजे आहे त्यांचे चालू राहूदे).